Advertisement

 भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी 

प्रजापत्र | Sunday, 24/12/2023
बातमी शेअर करा

भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी आठ गडी राखून हा विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारताने ४०६ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा केल्या.

 

 

टीम इंडियाकडे पहिल्या डावात १८७ धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉल ऑनसग मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात २६१ धावा केल्या. अशारितीने भारताला ७५ धावांचे लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात २१९ धावांवर गारद झाला होता. यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला काही खास करता आले नाही. संपूर्ण संघ २६१ धावा करून ऑलआऊट झाला.

 

 

भारतीय संघाने पहिल्या डावात ४०६ धावा आणि दुसऱ्या डावात २ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या डावात ताहलिया मॅग्राने अर्धशतक झळकावलं. तिने ५६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. मूनीने ४० तर हेलीने ३८  धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात पुन्हा मॅग्राने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर एलिस पेरीने ४५ , मूनीने ३३, हेलीने ३२ धावांची खेळी केली.

Advertisement

Advertisement