Advertisement

  'तारीख पे तारीख दिली, आता शब्द पाळावा 

प्रजापत्र | Thursday, 21/12/2023
बातमी शेअर करा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे २ दिवस उरलेत. २४ डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र सरकारकडून पुन्हा डेडलाईन वाढवून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. याच पाश्वभूमीवर सरकारने दिलेला शब्द पाळावा, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"संविधानीक दृष्ट्या मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण देऊ शकत नाही. सरकारने तारीख पे तारीख दिली आणि स्वतःवर संकट ओढावून घेतले. आता दिलेला शब्द पाळा.." असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

 

 

 

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनावरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला. "अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते. आम्ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. पण सरकारला विदर्भासाठी पॅकेज द्यायचं नव्हते..." असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
 

Advertisement

Advertisement