Advertisement

  मराठा समाजाला आरक्षण देणारच, त्यांचा तो अधिकार 

प्रजापत्र | Tuesday, 19/12/2023
बातमी शेअर करा

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी निवेदन सादर केलं. आरक्षणासाठी दोन समाजात तेढ निर्माण होणं चांगलं नाही. सीएम म्हणून माझ्यासाठी सर्व जाती समान आहेत. आरक्षण हा समाजाचा अधिकार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं.

 

मराठा आरक्षणावर मुख्यंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज विधानसभेत मराठा आरक्षणावर निवेदन सादर केलं आहे. मराठा आरक्षणावर सरकारने निर्णय घ्यावा, २४ डिसेंबरनंतर सरकारला आपण वेळ देणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. आज मुख्यमंत्री विधनासभेत आरक्षणावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणं चांगलं नसल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत म्हटलं.

 

मराठा आरक्षणावर  विधानसभेत मराठा आरक्षणात ७४ आमदारांनी १७ तास १७ मिनिटे चर्चा झाली. आरक्षणाविषयी सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे. पहिल्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे अशी सरकारची भूमिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
 

Advertisement

Advertisement