नागपूर - कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली नीरव मोदी यांची असल्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी लावला आहे. हा आरोप खोडून काढत युवा आमदार रोहित पवार यांनी हिंमत असल्यास संबंधित जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्र विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलन केले होते. त्यानंतर आज गुरुवारी ते उपराजधानीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड येथे औद्योगिक वसाहत होण्याच्या मागणीचे जॅकेट घालून एंट्री केली.
बातमी शेअर करा