क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू डेरेक स्टर्लिंग यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेरेक यांनी १९८४ ते १९८६ दरम्यान न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केलं. ते वेगवान गोलंदाज होते.
अशी राहिलीये कारकिर्द..
डेरेक स्टर्लिंग यांना दोन वर्ष न्यूझीलंड संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ६ वनडे आणि ६ कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना १३ गडी बाद करता आल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांना ६ गडी बाद करता आले. इवेन चॅटफिल्ड, रिचर्ड हॅडली आणि लान्स केर्न्स यासांरख्या दिग्गज गोलंदाजांनी एक काळ गाजवला.त्यांच्या युगात खेळलेल्या डेरेक स्टर्लिंग यांना आपली छाप सोडता आली नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी..
डेरेक स्टर्लिंग यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी ३३.७२ च्या सरासरीने आणि २०६ गडी बाद केले होते. यादरम्यान ६ गडी बाद करुन ७५ धावा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली