अंबाजोगाई - पिक विमा, दुष्काळी अनुदान कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी आज (दि.३०) डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज (दि.३०)मोर्चा काढण्यात आला. यातील प्रमुख मागण्यामध्ये सन 2022-23 आग्रीम पीकविमा अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाला वेगळा न्याय का? 13,500/- रु. प्रमाणे हेक्टरी 25% प्रमाणे आग्रीम द्यावा व पुढील पीक कापणीनंतर जो निकष बसेल त्याप्रमाणे विमा मिळावा, खरीप हंगामातील बहुभूधारक शेतकर्यांचा तपासणी अहवाल (व्हेरीफिकेशन) साठी प्रलंबीत ठेवलेली पीकविमा रक्कम तात्काळ देण्यात यावी, अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शेतकर्यांची पीक कर्ज माफी करावी, पीक विमा रक्कमेतून पीक कर्ज वसुली करु नये, सन 2022 व 2023 चे दुष्काळी चालु वर्षाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, सन 2019-20, 2020-21, 2021-22 मधील अतिवृष्टी व नापीकीमुळेचे मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे, छ. शिवाजी महाराज कर्जमाफी व महात्मा फुले कर्जमाफी या दोन्ही कर्जमाफी मध्ये पात्र असून अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकर्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, सन 2019-20, 2020-21, 2021-22 या काळातील मंजूर पीक विमा वंचित शेतकर्यांना तात्काळ वाटप करावे, नियमित पीक कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना शासनाने मंजूर केलेले प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वाटप करावे. या सर्व मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. या मोर्च्यात शेकडो शेतकरी सहभागी होते.