Advertisement

 राज्यात अवकाळी आणि मुख्यमंत्री तेलंगणात

प्रजापत्र | Tuesday, 28/11/2023
बातमी शेअर करा

राज्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अवकृपेने बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या अस्मानी संकटावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारवर कडक शब्दात हल्लाबोल केला आहे.

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"अवकाळी पाऊस आणि गारपीठीमुळे शेतककऱ्यांचे खूप नूकसान झाल आहे. कांद्याचे आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र आजचे मुख्यमंत्री स्वच घर सोडून दुसऱ्याच्या घरी धुंडाळत आहेत. दुसऱ्यांचे घर धुंडाळणारे हे भुरटे काय न्याय देणार..." असा घणाघात उद्धव  ठाकरेंनी केला.

"पंचतारांकित शेतीमध्ये मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने जातात. इतर शेतकऱ्यांचीही तेवढीच प्रगती झाली पाहिजे. भाजप सध्या प्रचारांमधून रेवड्या उडवत आहेत. इतर राज्यांवर रेवड्या वाटणारे महाराष्ट्राला कधी देणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळाला नाही? पीकविम्यावरुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचेही ते यावेळी म्हणले.

Advertisement

Advertisement