Advertisement

गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी शुभमन गिल

प्रजापत्र | Monday, 27/11/2023
बातमी शेअर करा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ गुजरात टायटन्स (GT) चे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. फ्रँचायझीने सोमवारी याची घोषणा केली. हा बदल अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने संघ सोडल्यामुळे झाला आहे.

हार्दिक पुढील सत्रात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. एमआयनेही आज सोशल मीडियावर त्याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, MI ने कॅमेरून ग्रीनचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी (RCB) ट्रेड केला आहे.

 

गिलने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले

गिल हा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. गिलने 7 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. 24 वर्षीय गिलने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 91 सामन्यात एकूण 2790 धावा केल्या आहेत.

 

हार्दिकने पहिल्याच सत्रात गुजरातला चॅम्पियन बनवले होते

गुजरात टायटन्स संघाने 2022 च्या हंगामात प्रथमच आयपीएलमध्ये प्रवेश केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या सत्रातच चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. 2023 च्या मोसमातही गुजरात संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. इतकं यश मिळूनही गुजरातचा संघ आणि पांड्याचं बाहेर जाणं चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना आश्चर्यचकित करत आहे.

 

मुंबई इंडियन्स हार्दिकला कर्णधार करणार का?

हार्दिकने आयपीएलच्या मागील दोन हंगामात कर्णधारपदाची क्षमता सिद्ध केली आहे. याशिवाय, भारताच्या पांढऱ्या चेंडू संघाचा पुढील नियमित कर्णधार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे. मुंबई इंडियन्स हार्दिकला संघाचा कर्णधार बनवू शकते, असे मानले जात आहे. मात्र, रोहित शर्माकडून कर्णधारपद काढण्याचा निर्णय सोपा नसेल. रोहितने मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवले आहे.नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले आहे.

 

हार्दिकला मुंबईनेच शोधून काढले होते

हार्दिक पंड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. त्याच्या उपस्थितीत मुंबईने 4 आयपीएल विजेतेपद पटकावले. हार्दिक 2021 पर्यंत मुंबई इंडियन्समध्ये राहिला. यानंतर तो जखमी झाला आणि जेव्हा तो परतला तेव्हा तो गोलंदाजी करत नव्हता. मुंबईने त्याला 2022 मध्ये सोडले. तेव्हापासून तो दोन मोसम गुजरात टायटन्सचा कर्णधार होता.

Advertisement

Advertisement