आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे. उद्या (बुधवार) परत याप्रकरणी सुनावणी होणार आहे. उद्या सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरवात होईल. २ सत्रात ही सुनावणी होणार आहे.
आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी आज सुनील प्रभू यांना काही प्रश्न केले. त्याचे उत्तर प्रभू यांनी दिले. अपात्रता याचिकेवर मँरेथॉन सुनावणी होणार आहे. उद्यापासून २४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार असून तीन दिवसांच्या सुट्टीनंतर २८ ते ३ डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी होणार आहे. रविवारी ३ डिसेंबरलाही सुनावणी होईल.
व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवल्या जाणार आहे.
आज नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले. ठाकरे गटाने त्यांच्या प्रश्नावर देखील आक्षेप घेतला. मात्र महेश जेठमलानी यांनी मी प्रश्न विचारणार, असं ठामपणे सांगितले.