अंबाजोगाई- शिवशाही बसच्या चाकाखाली येवून वृद्धाचा गुडघ्यापासून पाय तुटल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार, अंबाजोगाई शहरात रस्त्याचे काम सुरू आहेत त्यातच बसस्थानकासमोर फळ विक्रेते हात गाडे लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने बस स्थानकात जाणाऱ्या बसेसना मोठी कसरत करावी लागत आहे. लातूर - परळी शिवशाही बस क्रमांक (MH 09 EM9971) लातुरहुन अंबाजोगाईला आली बस स्थानकात जात असताना अपघात झाला आहे.
या बसच्या खाली वृद्ध येऊन त्या वृद्धाचा अपघातात गुडघ्यापासून पाय तुटल्याची घटना घडली ,लागलीच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत सदरील वृध्दाला अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून वृद्धाचे नाव नारायण कोल्हा जाधव वय ७० वर्ष रा अस्वल अंबा ता धारुर असे आहे
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम करण्यासाठी एका बाजूने रस्ता उखडून टाकला आहे. तर फळ विक्री करणारांचे हातगाडे देखील रस्त्यावर उभे असल्याने याचा त्रास वाहनधारकांना करावा लागत आहे. या गंभीर बाबी कडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.