अंबाजोगाई - येथील आरोपी राहुल शिंदे याने ९ ऑगस्ट २०१६ रोजी विष्णू कदम यास बळजबरीने घरा बाहेर नेऊन त्याने त्याच्या छातीवर चाकूने वार करून खून केला. या प्रकरणी आज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने आरोपी राहुल शिंदे यास जन्मठेप व रोखरक्कम ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
अधिक माहिती अशी कि, येथील राहूल विष्णु शिंदे, (वय-३०) याने दिनांक ०९ ऑगस्ट २०१६ रोजी संध्याकाळी दहा वाजण्याचे सुमारास फिर्यादी व मयत दत्ता व दुसरा मुलगा अनिल असे जेवण करीत असताना आरोपी राहुल विष्णु शिंदे रा. बंकट गल्ली, अंबाजोगाई हा फिर्यादीचे घरी आला व मयत दत्ता मधुकर कदम, रा.बंकट गल्ली अंबाजोगाई यास बाहेर चल असे म्हणाला, त्यावेळी फिर्यादी आरोपी यास म्हणाली की, दत्ता यास जेवण करायचे आहे तरी पण आरोपी त्यास बाहेर घेऊन गेला व थोड्या वेळाने बाहेरून प्रशांत सुरवसे हा फिर्यादीचे घराकडे आरडत आला व म्हणाला की तुमचा मुलगा दत्ता यांचे भांडण चालु आहे त्यावरून फिर्यादीने घराबाहेर जाऊन पाहिले असता आरोपी याचे दाराच्या समोर रोडवर मयत दत्ता मधुकर कदम यास राहुल शिंदे हा चाकुने मारीत होता. त्यावेळी फिर्यादीने मयत दत्ता यास पाहिले असता त्यास पोटात छातीवर चाकूचे वार केलेले होते व जमिनीवर रक्त पडलेले होते. त्यावेळी फिर्यादीस मयत दत्ता यांचे रक्त पाहुन चक्कर आली व फिर्यादी खाली पडला. त्यानंतर मयत दत्ता कदम यास मार लागलेला असल्याने त्यास फिर्यादी व सुनिल व अनिल, महेश कदम, गणेश कदम, दिनेश चव्हाण, प्रशांत मुरवसे यांनी त्यास महेश कदम याचे कारमध्ये उपचारासाठी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले व आरोपी यास महेश कदम याने पकडुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे घेऊन गेला व नंतर दत्ता मधुकर कदम यास सरकारी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरानी तपासून तो मयत झाल्याचे सांगीतले. फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पो.ठाणे अंबाजोगाई शहर गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. निरीक्षक एस. सी. होगले यांनी करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणामध्ये फिर्यादी हिबा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब महत्वाची ठरली.
सदर प्रकरणामध्ये सरकारी वकीलांनी युक्तीवाद करत असताना सरकार पक्षाने मयतास आरोपीनेच चाकूने खून केला आहे असा युक्तीवाद केला व सदर युक्तीवाद व पुरावा न मा.न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकंदरीत ७ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल ऍड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी बाजू मांडली आणि कोर्ट पैरवी म्हणून म्हणून पो. उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकुर, स. फो. वार्ल्स फ्रान्सिस, पो.हे.कॉ. बाबुराव सोडगीर यांनी काम पाहीले.