Advertisement

बिबट्या ठार पण त्या' प्राण्याचे गुढ कायम...

प्रजापत्र | Saturday, 19/12/2020
बातमी शेअर करा

किल्लेधारूर  : शहराजवळच असलेल्या गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्याने म्हशीचा फडशा पाडला होता. याबाबतचे गुढ सोमवारी उकलणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या ठार झाला असला तरी सदरील प्रकार काय याची उत्सूकता लागली आहे.
                       गोपाळपूर शिवारातील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांच्या शेतातील म्हैस  (वगार) अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली. सदरील मृत वगारीचा व घटनास्थळाचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्या सारख्या हिंस्त्र पशूच्या पायांच्या ठशांचा शोध घेण्यात आला. मृत वगारीचे शवविच्छेदन करुन व्हिसेरा पाठवण्यात आला आहे. याभागात इतर प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळली नसुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सदरील शवविच्छेदन अहवाल सोमवारी उपलब्ध होईल अशी माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. जी.  वरवडे यांनी दिली.

 

Advertisement

Advertisement