Advertisement

विजेचा शॉक लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 06/09/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार लावताना विद्यार्थ्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे घडली आहे. सुदाम चंद्रकांत पवार (वय- १४) असं शॉक लागून मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

तो देवळा गावातील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यावर सुदाम घरी आला होता. यावेळी घरी असलेल्या नळाला पाणी आले होते. आईला मदत करण्यासाठी त्याने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावत होता. यावेळी शॉक लागून तो जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

सुदामचे वडील चंद्रकांत पवार हे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुदाम हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement