पाटोदा -: तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाउपाध्यक्ष सय्यद मुजाहेद तय्यब वय वर्षे २६ हे कामानिमित्त नाशिक येथे जात असताना यांचा आज पहाटे अहेमद नगर मनमाड महामार्गवर झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच यांचे अपघाती निधन झाले.
पहाटे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना अहमदनगर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले.
सय्यद मुजाहेद हे कारेगाव येथून पहाटे तहाज्जुब ची नमाज पटण करून नाशिक येथे काही कामानिमित्त जात असताना, नगर मनमाड महामार्गवर अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झालेत, त्यांना तात्काळ अहमदनगर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कारेगावसह तालुक्यात दुःखाचे वातावरण आहे.सय्यद मुजाहेद सामाजिक कार्यात अग्रेसर होते,त्यांनी माजी कृषीमंत्री तथा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किट वाटप केले होते.तर मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप,वृक्ष लागवड असे अनेक उपक्रम राबविले होते.सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी विद्यमान मंत्र्यांच्या भेट घेऊन कामे मार्ग लावण्यात ते अग्रेसर होते त्यांच्या या कार्याबद्दल सर्वसामान्य लोक त्यांच्याशी संपर्क करत होते.त्यांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रजापत्र | Wednesday, 16/12/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा