गेवराई-शहरातील नगरसेवक पती अरूण मस्के यांच्या खाजगी गोदामात अवैध धान्य सापडल्या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. अद्याप ते या प्रकरणात फरार असून त्याचा शोध घेणे सुरु असताना याप्रकरणातील सहआरोपी असलेले त्यांचे भावा मोहन मस्के याला अटक करण्यात आली आहे. एसआयटी पथकातील पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी अटकेची माहिती दिली. सदरच्या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असुन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनात धावपळ सुरू आहे.तपासा दरम्यान पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अरुण मस्के यांचे भाऊ मोहन मस्के याला मध्यरात्री अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणात अजून किती लोक यात सहभागी हे लवकरच स्पष्ट होईल.
बातमी शेअर करा
Leave a comment