Advertisement

जिजाऊ माँसाहेब बॅंक घोटाळा प्रकरणी बीडमध्ये आक्रोश मोर्चा

प्रजापत्र | Wednesday, 19/07/2023
बातमी शेअर करा

 

 

बीड - जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट बँकेचा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आज (दि.१९) रोजी ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आहे. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

 

शहरातील जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट बँकेत जादा व्याजदराचे आमिष दाखवून शेकडो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी बीडपाठोपाठ नेकनुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी तब्बल १२०० हून अधिक ठेवीदारांचे जवाब नोंदविले आहेत. या घोटाळ्याचा पोलिसांनी गतीने तपास करावा, ठेवी मिळवून द्याव्यात, या मागणीसाठी ठेवीदरांनी आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो ठेवीदार सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष ॲड. अप्पासाहेब जगताप यांनी केले. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Advertisement

Advertisement