नेकनूर दि.५ - मागच्या काही दिवसांपासून अंबाजोगाई ते केज आणि केज ते बीड या दरम्यान अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रस्त्याचे मजबुतीकरण झाले मात्र या रस्त्याचे वाहतुकीचे नियम न पाळता अती वेगाने वाहने धावू लागलेले आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत कित्येकांना आपला जीव यामध्ये गमवावा लागलेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा दुपारी 2.30 ते 3 च्या दरम्यान नेकनुर जवळ भिषण अपघात झाला असुन त्यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे.
नारेवाडी येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे हे दोघे बापलेक बीडवरून गावाकडे निघाले होते. दरम्यान, नेकनूरपासून पासुन काही अंतरावर असणाऱ्या गुलाम सागर तळ्याजवळ श्री कालिका प्रतिष्ठान मंगल कार्यालयाच्या जवळ चारचाकी विस्टा गाडीचा (क्र MH.17 V 9697) तसेच पॅशन प्लस (MH20 CN 4015) व हॉन्डा शाईन गाडी क्र. (MH23 AZ5810) चा भिषण अपघात झाला असुन बाप लेकाचा जागीच मृत्यु झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून नेकनुर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट झालेले नाही.