माजलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत केंद्राला करायची की राज्याला यावरून राजकारण सुरु असतानाच समाजातील दातृत्व मात्र वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. माजलगाव तालुक्यातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक लाखाची मदत करत आपल्यातील सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
माजलगाव येथील अन्नपूर्णाबाई मिरगे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल १ लाखाचा धनादेश दिला असून त्या दिवंगत स्वातंत्र्य सैनिक नारायणराव मिरगे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी हा धनादेश माजलगावच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्याकडे सोपवला. यावेळी नायब तहसीलदार रामदासी , शाम मिरगे, मुरलीधर चव्हाण यांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा
Leave a comment