अंबाजोगाई - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षकास अज्ञात वाहनाने धडक दिली. या दुर्घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे अंबाजोगाई - अहमदपूर रस्त्यावर तळणी परिसरात घडली. मुंजाजी होळंबे (वय ४९ रा. मैंदवाडी ता. परळी, बीड) असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
मुंजाजी होळंबे (वय ४९ रा. मैंदवाडी ता. परळी, बीड) हे नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रस्त्याने पुढे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्याकडेला पडले होते.
यावेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत (death) घोषित केले. लेंडेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होळंबे शिक्षक (Teacher) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.