Advertisement

अवकाळी पावसाच्या कहराने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 11/05/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.११ (वार्ताहर) -  धारुर तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पिक उध्वस्त झाल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

धारुर तालुक्यातील ढगेवाडी येथील शिवाजी बलभिम अंडील (अंदाजे वय ३५) या तरुण शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. आज (दि.११) गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या या तरुणाचे उपचार सुरु असताना निधन झाले. पिकाची नासाडी व कर्जाच्या बोजामूळे आणखी एका शेतकऱ्याने   आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात ४० गुंठ्ठे क्षेत्रात मिरचीचे पिक घेतले होते. गेल्या महिनाभरापासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीत सदर पिकाची नासाडी झाली. डोक्यावर बँकेचे कर्ज असल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
 

 

Advertisement

Advertisement