बीड दि.15 (प्रतिनिधी): सार्या बीड वासियांना प्रतिक्षा असलेल्या मिना बाजारला अखेर शनिवारी सुरूवात झाली. शनिवारी सायंकाळी या मिनाबाजारचे उद्घाटन करण्यात आले.
रमजानच्या निमित्ताने बीड शहराच्या बशीरगंज परिसरात भरणारा मिना बाजार हा केवळ मुस्लिम धर्मियांच्याच नव्हे तर संपुर्ण बीडकरांच्या प्रतिक्षेचा विषय असतो. यावर्षी मिना बाजार सुरू व्हायला काहीसा उशिर झाला. शनिवारी सायंकाळी या मिना बाजारचे उद्घाटन झाले. रमजान ईद पर्यंत हा मिना बाजार सुरू असतो. या वर्षी देखील मिना बाजारमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 50 च्या आसपास दुकाने दाखल झाली आहेत.
बातमी शेअर करा