Advertisement

आठ महिन्यानंतर पुन्हा घुमू लागले वाद्यांचे आवाज

प्रजापत्र | Saturday, 05/12/2020
बातमी शेअर करा

किरण धोंड
परळी  : मागच्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या वाजंत्रीचे आवाज आता पुन्हा एकदा घुमायला सुरुवात झाली आहे. त्या सोबतच बॅन्ड आणि डिजे यांनाही लग्नसमारंभात मागणी वाढत आहे. कोरोनाच्या काळात हे सारे बंद पडले होते. 
लग्नाच्या वरातीत वाद्य वाजू लागल्याने वाद्याच्या तालावर पावले  थिरकू लागली आहेत. बँडबाजासह लग्नाच्या वराती निघू लागल्याने वरातीत पूर्वीप्रमाणेच जल्लोष दिसू येउ लागलाा आहे. कोरोनामुळे उन्हाळ्यातील लग्नाचे बार हुकल्याने नोव्हेंबर महिन्या पासुन लग्नाची धामधूम सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लग्न - वरातीची शोभा वाढविणारे खरे ते बँड  वाजंत्री वरातीत वाजू लागल्याने लग्न वरातीतील मंडळींबरोबरच बघणार्‍यांनाही आनंदाचे भरते येताना दिसत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेली आठ महिने वाजंत्री व्यवसाय पूर्णतः बंद होता. लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर सर्वच व्यवसाय टप्याटप्याने सुरु झाले पण वाद्यांचे आवाज निनादायला तब्बल आठ महिने लागले. कोरोना काळात मिळेल ती कामे करून, वेळप्रसंगी उपासमार सहन करून दिवसं काढलेल्या वाजंत्री व्यावसायिकांनी जुना कठीणाईचा काळ विसरून नव्या दमाने वाद्य व्यवसायास सुरुवात केली आहे.  लॉकडाऊन काळात कामे नसल्याने हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागलेल्या वाजंत्री वादकांना आता कामे मिळू लागल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटत आहेत. लग्न समारंभांचा धडाका सुरु झाल्याने बँड पथकांनाही मोठ्या प्रमाणात  काम मिळू लागल्याने वाद्य व्यावसायिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. बर्‍याच दिवसानंतर वाद्यांवर हात फिरू लागल्याने वाद्य वाजविणार्‍यांमध्ये वेगळाच जोश पाहायला मिळत आहे. दीर्घ कालावधीनंतर वाद्याची धून कानी पडू लागल्याने वारातीतील मंडळी बरोबरच बघणार्‍यांचा उत्साह ही शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. अडगळीत पडलेल्या वाद्यांवरील धूळ झटकत वादकांनी वाद्यांमधून धून झंकारण्यास सुरुवात केल्याने वाद्याच्या तालावर पावलेही थिरकू लागली आहेत. आठ महिण्याच्या कालावधीनंतर वरातीत वाद्य वाजविण्याची मुभा मिळाल्याने वादकांमध्येही वेगळाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

 

हेही वाचा 

Advertisement

Advertisement