औरंगाबाद : राज्य विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी वुइकर्मी ६४ % मतदान झाल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. मात्र प्रत्यक्ष निकालासाठी सर्वांनाच आजच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अगदी साधारण कल देखील मध्यरात्रीपर्यंत मिळणार नाही.
पदवीधर मतदारसंघाचे मतदान मतपत्रिकांद्वारे होते, त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया मोठी असते. सध्या औरंगाबाद येथे मतमोजिनीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यांच्या मतपत्रिका औरंगाबाद येथे आल्या होत्या. सध्या मतप्रतिका मतपेट्यांमधून बाहेर काढण्यात आल्या असून त्याचे २५ मतपत्रिकांचा एक असे गट्ठे तयार करण्यात येणार आहेत. हे गट्ठे तयार कर्णयचे काम हेच अत्यंत किचकट असून , मतमोजणी प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा आहे. २ लाख ४० हजार मतपत्रिकांचे गट्ठे बांधण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून हि प्रक्रिया संपायलाच सायंकाळचे ७ वाजतील अशी अपेक्षा आहे.
हे गट्ठे बांधून झाल्यानंतर प्रत्येक टेबलवर प्रत्येक फेरीसाठी १० गट्ठे , म्हणजे अडीचशे मतपत्रिका दिल्या जातील. आणि त्यातून पहिल्या पसंतीची मते मोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे पहिल्या पसंतीचा कल समजायला देखील किमान मध्यरात्र होणार आहे. तर पहिल्या पसंतीचे निष्कर्ष समोर यायला शुक्रवारची पहाट उजाडेल.
जर पहिल्या पसंतीच्या मतदानात कोणालाच कोटा पूर्ण करता आला नाही, तर इलिमिनेशन प्रक्रियेतून दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील, तसे झाल्यास निवडणुकीचा निकाल लागायला शुक्रवारची दुपार उजाडणार आहे. त्यामुळे सध्या तरी निकालाबाबत केवळ अंदाज व्यक्त करण्यापलीकडे काही होणार नाही.
हेही वाचा