ठाकरे गटाच्या मोर्चा (Thackeray Thane Morcha) आणि सभेला अखेर ठाणे पोलिसांकडून (Thane Police) परवानगी देण्यात आली आहे. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी मोर्चासाठी काही अटी आणि शर्थीला देखील घालून दिल्या आहेत.
ठाण्यातील मोर्चाला दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
महत्वाच्या अटी आणि शर्थी
- सदर कार्यक्रम दिलेल्या वेळी तारखेस व ठिकाणी सुरू करून मुदतीत संपवण्यात यावा.
- कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता पार पाडण्यात यावा.
- कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शित करू नये.
- आक्षेपार्ह, प्रक्षोभक, अगर कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करू नयेत आक्षेपार्य प्रक्षोभक गाणी गाऊ नयेत अथवा वाजवु नयेत.
- व्यक्ती, प्रेत, किंवा आकृत्या त्यांच्या प्रतीमा त्यांचे प्रदर्शन करणे किंवा जाळणे अशी कृत्य करू नये.
- सदर कार्यक्रमाच्या दरम्यान कोणताही प्रकारे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवून शांततेस बाधा पोहचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाविकास आघाडी सभा
- ठाण्यातील शक्तीस्थळवर महाविकास आघाडीचे छोटीशी सभा देखील होणार आहे.
- या सभेमध्ये महाविकास आघाडीचे ठाण्यातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहे.
- या सभेचा नेतृत्व आदित्य ठाकरे, सुनील राऊत, राजन विचारे, केदार दिघे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यासोबतच काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण सोबत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
- मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत..
- मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला आहे.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. या अर्जाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले.