Advertisement

जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट!

प्रजापत्र | Monday, 03/04/2023
बातमी शेअर करा

राहुल गांधी यांना आज सुरत कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्या दुसऱ्या याचिकेवरची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. मात्र सुरत कोर्टातून जामीन मिळताच राहुल गांधींसह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्वीट चर्चेत आहे. माझा संघर्ष सुरू आहे आणि सत्य हेच माझं अस्त्र आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

काय आहे राहुल गांधी यांचं ट्वीट?

ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है।

इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे असं वक्तव्य कायम करतात. त्यावर टोमणा मारत सध्या मित्रकाळाच्या विरोधात लोकशाही वाचवण्याची ही लढाई आहे. या संघर्षात सत्य हे माझं अस्त्र आहे आणि सत्याचाच मला आधार आहे या आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम त्यांच्या मित्रांची मदत करतात असा आरोप कायमच राहुल गांधी करत असतात. त्यानंतर आता त्यांनी या आशयाचंच ट्वीटही केलं आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळ्या चोरांचे नाव मोदी कसं  असते असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची सुनावली होती. तर आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह आणि तमाम काँग्रेस नेते सुरतमध्ये पोहचले होते. सुरतच्या कोर्टात जी आव्हान याचिका राहुल गांधी यांनी दाखल केली होती त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement