Advertisement

वेळ पडल्यास पाणी कपातीचा निर्णय

प्रजापत्र | Friday, 31/03/2023
बातमी शेअर करा

मागील वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्यानं धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं सध्या फारशी पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र, वाढत जाणाऱ्या कडक पडणाऱ्या उन्हामुळं पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे. त्यामुळ यावर्षी जर वेळेवर पाऊस नाही पडला तर पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जरी पाणीटंचाई जाणवत नसली तरी परिस्थितीनुसार पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल, असं मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

नियोजन करण्याचे गावनिहाय आराखडे तयार
एल निनोच्या प्रभावामुळं उष्ण तापमान वाढेल, त्याचबरोबर पावसाळाही लांबण्याची अंदाज असल्याने पाणी टंचाईचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आतापासूनच पाण्याची बचत करावी लागणार आहे. यंदा राज्यात पाऊस चांगला झाला असल्यानं राज्यातील काही धरणे सोडली तर बहुतांश धरणात पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळं सध्या पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. मात्र परिस्थिती जशी समोर येईल त्या पद्धतीनं निर्णय घेऊन त्यावर मात करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे गुलाबराव पाटील म्हणाले. वेळ पडलीच तर पाणी कपातीचा निर्णयही घेतला जाईल असेही ते म्हणाले. सध्या पाणी टंचाईचे सावट असले तरी राज्य सरकार पूर्णपणे त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासाठी  नियोजन करण्याचे गावनिहाय आराखडे तयार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यावर पाणी टंचाईचे सावट असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरावं अस आवाहनही पाटील यांनी केलं.

Advertisement

Advertisement