माजलगाव - तालुक्यातील मंगरूळ नं.2 मध्ये एका 23 वर्षीय महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.
याबद्दल अधिक माहिती अशी की ऊसतोडी साठी आलेल्या सुरेखा अनिल खंडारे (वय-23) रा.बेंद्रवाडी ता.मानवत जि.परभणी ह्या तालुक्यातील मंगरूळ नं.2 मध्ये ऊसतोडणीसाठी आल्या होत्या दरम्यान येथील शेतकरी महादेव बापमारे यांच्या शेतातील विहिरीत या महिलेने आज सकाळी 10.30 च्या सुमारास उडी टाकून आपले जीवन संपविले आहे. हि घटना समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला आहे. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळाले नसून अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
