केज - खामगाव -पंढरपूर महामार्गावरील केज तालुक्यातील मांगवडगाव फाटा ते मांजरा नदीवरील पूल ,कळंब शहराजवळील धाराशिव जिल्हा हद्दीपर्यंत अत्यंत खराब व नादुरुस्त रस्त्यामुळे चालू मालवाहतूक वाहनातून शेतमाल चोरीला जात असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.तसेच वाहनांचे ,विशेषतः दुचाकी अपघात झाले , गेल्या महिनाभरात सोयाबीनचे कट्टे चोरीच्या घटना घडल्या परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केज तहसील कार्यालयाला सोमवारी (दि.२०) मांगवडगाव फाटा येथे रस्त्याच्या कामासाठी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची तातडीने मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने दखल घेतली असून मांगवडगाव फाटा ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे आता या आंदोलनाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,स्वाभिमानीने दिलेल्या आंदोलनाची पोलिसांसह प्रशासनाने दखल घेतल्याने मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला तात्काळ सूचना देऊन रखडलेले काम चालू करायला सांगितले त्यानुसार मेगा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सदर काम चालू केले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नियोजित चक्काजाम आंदोलन करू नये यासाठी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.योगेश उबाळे व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व सह पदाधिकारी यांची पोलीस ठाण्यात एक बैठक झाली या बैठकीत प्रशासनाच्या समन्वयाने सदर चक्काजाम आंदोलन स्थगित झाल्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ ,अशोक साखरे, फेरोज पठाण ,अतुल गवळी,सुग्रीव करपे, राचलिंग पाटील,सतीश शिंदे,संदीप भाकरे ,उमेश गायकवाडसह पदाधिकाऱ्यांनी घेतला.
प्रजापत्र | Monday, 13/03/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा