किल्लेधारूर दि.१२ (वार्ताहर) धारूर येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या कोमल रामेश्वर शिंदे (वय १८ वर्ष) या मुलीचा रविवारी सकाळी पाण्याची मोटर लावत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
धारूर शहरातील कसबा विभागात सकाळी नळाला पाणी आले म्हणून मोटर लावण्यास गेलेली असताना कोमल रामेश्वर शिंदे या महाविद्यालयां मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीचा निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, ती अकरावी विज्ञान वर्गात शिकत होती. तिच्या पश्चात वडील, आई, एक बहीण व एक भाऊ असा परिवार आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा