Advertisement

केज बसस्थानकात पत्रकारास मारहाण

प्रजापत्र | Tuesday, 07/02/2023
बातमी शेअर करा

केज– केज बसस्थानकात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत. सुदर्शन न्यूज या टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी अभिमन्यू शिवाजी फड हे औरंगाबाद अंबाजोगाई गाडीने प्रवास करीत होते. यावेळी केजहुन एसटी बस मध्ये चढलेले डॉ. मोसीन शेख आणि त्याच्या सोबतच अनोळखी इसम त्यांना पाठीमागे सरक असे म्हणत तु सुदर्शन न्युज चॅनलला काम करतोस काय ? असे म्हणून कॉलर धरुन खाली ओढुन मारहाण करुन शिविगाळ केली. तसेच त्यांच्या सोबतच्या काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या अनोळखी इसमाने फड यांचा शर्ट फाडुन शिविगाळ केली. त्या दोघांनी पत्रकार फड यांना लाथाबुक्क्यांनी व चापटाने मारुन जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत पत्रकार फड यांच्या हातातील घड्याळ तुटले आहे. या प्रकरणी सुदर्शन न्यूजचे पत्रकार अभिमन्यू फड यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून डॉ. मोसीन शेख आणि त्यांच्या साथीदारा विरुद्ध गु.र.नं. ७०/२०२३, भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ आणि यासह महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य) मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतीबंधक अधीनीयम २०१७ या पत्रकार हल्ला विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार अभिमन्यू फड यांच्या वरील मारहाण आणि हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास स्वतः आय पी एस सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement