अंबाजोगाई (प्रतिनिधी)- भाजपाने प्रदेश प्रवक्ता विस्तारित यादी जाहिर केली असुन त्यात पत्रकार राम कुलकर्णी यांची पुन्हा प्रदेश प्रवक्ता म्हणुन नियुक्ती करण्यात आली. मागच्या तीन वर्षापासुन प्रवक्तेपदी काम करताना संघटनात्मक कार्य आणि पक्षाची बाजु माध्यमाकडे मांडण्यात नेहमीच अग्रेसर राहिले. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात आनंद व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 2019 साली प्रदेश प्रवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तीन वर्षे प्रसारमाध्यमात त्यांनी केलेले लिखाण इलेक्ट्रॉनिक मिडियासमोर मांडलेली बाजू एवढेच नव्हे तर विरोधकांवर तुटुन पडणारा, स्पष्ट वक्ता, परखड बोलणारा प्रवक्ता अशी त्यांची ओळख होवुन बसली. प्रदेश संघटनात्मक बदल झाल्यानंतर काही दिवसापुर्वी प्रवक्ता पुनर्रचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यात विस्तारित प्रवक्ता यादी काल पुन्हा जाहिर करण्यात आली असून कुलकर्णी यांना प्रदेश प्रवक्ते म्हणुन पुन्हा घोषित करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काढले. राम कुलकर्णी हे पत्रकारितेच्या माध्यमातून तब्बल 31 वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या समाजकारण आणि राजकारणात काम करतात. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे पट्टशिष्य म्हणून विशेष ओळख आहे. राजकिय विश्लेषक म्हणुन त्यांचे लिखाण नेहमीच चर्चेत असते. वास्तववादी लिखाण करणारा पत्रकार ही पण त्यांची ओळख आहे. प्रवक्तेपदी नांव घोषित होताच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे, माजी आ.आर.टी.देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई मुंडे, ठाकूर उदयसिंह दिख्खत, महादेवराव दहिफळे, बालासाहेब गित्ते, अशोक जैन, रमाकांत बापु मुंडे, अनंतराव भोसले, महेश शेप, ठाकुर सुजितसिंह दिख्खत, बिपीनदादा क्षीरसागर, एॅड.मकरंद पत्की, सौ.वर्षाताई मुंडे, अमरनाथ खुर्पे, सोमनाथ बडे, जगदिश गोरे, प्रा.बिभीषण फड, पञकार दत्तात्रय आंबेकर, भास्कर खडके, जेष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर, हिंदुलाल काकडे, शिवाजीराव गित्ते, मयुर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, बाळु यादव, ज्ञानेश्वर माऊली किर्दंत, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्यासह मित्र परिवारांनी अभिनंदन केले. दरम्यान प्रवक्तापदी पक्ष नेतृत्वाने मला पुन्हा एकदा संधी देवून जो विश्वास टाकला तो आपल्या कामातून सेवाभाव वृत्तीने पुढे जाताना सार्थ करून दाखवू, मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मा.उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, मा.पंकजाताई मुंडे, मा.आ.श्रीकांतजी भारतीय, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, संघटनमंत्री संजयभाऊ कौडगे यांच्यासह अनेकांचे कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
प्रजापत्र | Friday, 03/02/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा