Advertisement

राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षपदाची माळ यांच्या गळ्यात

प्रजापत्र | Thursday, 02/02/2023
बातमी शेअर करा

बीड: जयसिंग सोळंके यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी अखेर युवक कार्यकर्ते विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत युवक प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब यांनी बांगर यांना नियुक्तीपत्र दिले.

 

   पाटोदा तालुक्यातील भायाळा ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले बाळा बांगर यांनी कोरोना काळात अनेकांना मोठा धीर दिला होता.पुरोगामी विचाराचा एक झुंजार कार्यकर्ता म्हणून बाळा बांगर यांची ओळख राहिलेली आहे. भायाळा गावचे सरपंच म्हणून काम करतानाच त्यांनी सर्वत्र युवकांची मोठी फळी निर्माण केलेली आहे. एक अभ्यासू आणि उत्साही कार्यकर्ता आणि कुशल संघटक असलेल्या बाळा बांगर यांना राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे.

 

गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी बाळा बांगर यांच्या पाठीशी शक्ती उभी केली होती. या निवडीबद्दल बांगर यांचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून बांगर यांनी श्रेष्ठींचे आभार मानले आहेत.
 

Advertisement

Advertisement