माजलगांव - शेतजमिनीची मोजणी भुमीअभीलेख कार्यालया कडुन घेतल्या नंतर जमीनीचा अधिकृत बांध टाकण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला शेजारी असलेल्या तीन शेतकर्यांनी संगनमत करुन बांध टाकण्यास मजाव करुन शिविगाळ करुन मारहाण केली तर त्याच्या सोबत असणार्या दुसर्या शेतकर्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळाली आहे की, माजलगांव तालुक्यातील डुब्बाथडी येथील शेतकरी राजेभाऊ रामभाऊ तौर यांची शेत जमीन माजलगांव तालुक्यातील काळेगावथडी शिवारातील गटनं.07 मध्ये आहे पण त्यांचे शेजारी असलेल्या काळेगावथडी येथील राजेभाऊ नामदेव तौर,कृष्णा रामेश्वर तौर,त्याचा भाऊ गणेश रामेश्वर तौर यांच्यात अनेक वर्षांपासून जमीनीची हद्दी बदल वाद निर्माण झाले होते. त्यामुळे राजेभाऊ रामभाऊ तौर यांनी माजलगांव तालुका भुमीअभीलेख कार्यालयात मोजणी साठी अर्ज सादर करुन मोजणी करुन घेतली होती. त्याप्रमाणे ते 28 जानेवारी रोजीच्या सकाळी 10 वा.शेतात बांध टाकण्यासाठी गेले होते पण त्या ठिकाणी प्रकरणातील नमुद नामे आरोपींना हजर झाले होते आणि त्यांनी राजेभाऊ रामभाऊ तौर यांना शिविगाळ करुन चापटाबुक्यांनी मारहाण केली. यावर त्यांच्या सोबत असलेले गजानन दशरथ तौर यांनी मध्यस्थी केली असता आरोपी नामे गणेश रामेश्वर तौर याने गजानन ला जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड ने डोक्यावर वार करून जबर दुखापत केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या तीनही आरोपीं कडुन देण्यात आल्या. अशी फिर्याद राजेभाऊ रामभाऊ तौर यांनी माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने उपरोक्त नमुद नामे तीन आरोपीं विरोधात भादंवि. कलम 504,323,307,506,34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढिल तपास पोउपनि.बोडखे करताहेत.
प्रजापत्र | Tuesday, 31/01/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा