बीड - अज्ञात चोरटयांनी मेडिकल चालकाच्या घराचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ४ लाख ८१ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील महाराष्ट्र बँक कॉलनी कॅनॉल रोड येथे घडली. दि. २७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
महराष्ट्र बँक कॉलनी येथील मेडिकल चालक सचिन वसंतराव धापडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.उप.नि. पाथरकर करीत आहे.
बातमी शेअर करा