केज - एसटी बसमधून खाली उतरताना एका वयोवृद्ध प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला आहे. वरपगाव येथील शेषेराव नारायण बनसोडे हे मंगळवार दि.24 रोजी वरपगाव-केज या गाडीने प्रवास करत होते. ते 6.30 च्या दरम्यान केज बस स्टॅडवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गाडीचे वाहक तांदळे आणि चालक लोकरे यांनी ही माहिती तात्काळ वाहतुक नियंत्रण जगदीश सिकची यांना एसटीमधून उतरत असताना दिली. त्यानंतर जगदीश सिकची यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तसेच यावेळी बस स्टँडवर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा.विनोद गुंड, चंद्रकांतमस्के, दिलीप गवळी आणि दिलीप बनसोडे यांनी त्यांना मदत केली. दरम्यान मयत शेषेराव बनसोडे यांचा मुलगा संतोष बनसोडे हा कुटुंबासह ऊसतोडणीसाठी कोल्हापुर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेले असल्याने ते त्यांच्याकडे जाण्यासाठी केजकडे येत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच वरपगाव येथील त्यांचे पुतणे माणिक बनसोडे यांनी केज येथे येऊन शेषेराव बनसोडे यांचा मृतदेह गावी घेऊन गेले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा