Advertisement

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 19/01/2023
बातमी शेअर करा

घाटनांदूर दि.१९ (वार्ताहर)-येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व खाजगी शिक्षक यांनी व्हॉटस अँपवर स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) सकाळी ८.१५ वाजता घडली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

        येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी प्रिय खाजगी शिक्षकवणी चालक नितेश काशिरामसिंग कोकणे (वय-४०) यांनी सकाळी ८.१५ वाजता व्हाटसपवरील स्टेटसवर चिताचा जळत असलेला व्हिडिओ अपलोड करून व 'कुछ पल या बैठीए जनाब, दोलत का नशा उतर जायेगा! मला माफ करा' ,आय ऍम सॉरी ,असे स्टेटस् ठेवून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.एका उच्च शिक्षित खाजगी शिक्षकाने असे जीवन संपवल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

गावात आठ दिवसात दुसरी आत्महत्या
गेल्या आठ दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या करण्याची गावात ही दुसरी घटना आहे.श्री.कोकणे यांच्या आत्महत्या करण्यामागील नेमके कारण पुढे आले नसून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement