Advertisement

महानंद दूध संघाच्या उपाध्यक्षपदी रामकृष्ण बांगर

प्रजापत्र | Wednesday, 18/01/2023
बातमी शेअर करा

बीड-महाराष्ट्रातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंद दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर, राज्यातील दूध व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्वांची निवड होते.बुधवारी(दि.१८) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

    

    महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदी काही दिवसापूर्वी बांगर यांची वर्णी लागली होती. रामकृष्ण बांगर हे १९८५-८६ पासून सातत्याने राज्य दूध महा संघावर संचालक म्हणून निवडून येत आहेत. त्याचप्रमाणे रामकृष्ण बांगर यांना २००९-१० वर्षी महानंदाच्या उपाध्यक्ष पदाची संधीही मिळालेली होती.आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे महानंदचे उपाध्यक्षपद आले आहे.

 रामकृष्ण बांगर यांच्या निवडीमध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे , आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांचे विशेष सहकार्य लाभले.दरम्यान रामकृष्ण बांगर यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Advertisement

Advertisement