माजलगाव : तालुक्यातील टाकरवण येथे अवैध मुरूम उत्खनन करून चोरी करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर शनिवारी ताब्यात घेतले. ही कारवाई आयपीएस डॉ.धीरज कुमार यांच्या पथकाने शनिवारी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील टाकरवण येथे अवैधरीत्या मुरूम उत्खनन करून चोरी करत असल्याची माहिती आयपीएस डॉ.धीरज कुमार यांना गुप्त बातमीदारकडून मिळाली. त्यानुसार शनिवारी (दि.७) दुपारी ३ वाजता पथकाने सापळा रचून टाकरवान परिसरात मुरूम उत्खनन करून वाहतूक करणारे अतुल बाबासाहेब गरड (वय २८) ट्रॅक्टर क्र. MH २३ ५७२३, सुभाष पांडुरंग आरबे (वय ३५) ट्रॅक्टर क्र. MH ४४ S ७६४२, अशोक शिवाजी पराड (वय ३९) ट्रॅक्टर क्र. MH ४४ S ४८४६ रा. टाकरवण ता.माजलगाव ह्यांची तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतली आहेत. याबाबत दंडात्मक कारवाईसाठी तहसिल कार्यलयास कळवले आहे. या पथकात हेड कॉन्स्टेबल अस्तिकुमार देशमुख, अनिल भालेराव, रवी राठोड, युवराज चव्हाण यांचा समावेश होता.