Advertisement

जिल्ह्यातील पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Wednesday, 28/12/2022
बातमी शेअर करा

बीड/नेकनूर दि.२८-सॉमिलमधील लाकडी मशिनचा परवाना नुतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना वन विभागातील चौघे व मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना सरपंच पुत्राला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२८) समोर आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिवसभरात पाच जणांवर कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
   बीडमधील सॉ मिल धारकांकडे वन विभागील तिघा-चौघांनी प्रत्येकी ५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रूपये देण्याचे ठरले होते. सर्व सॉ मिलधारकांकडून प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ५० हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पडताळणीनंतर बुधवारी (दि.२८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका सॉमिलच्या ठिकाणी वनरक्षक जाधव, चालक भालेराव, वनरक्षक शेख अकबर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले तर तक्रारदाराने नाव दिलेल्यापैकी एक कर्मचारी फरार झाल्याची माहिती आहे.दरम्यान या कारवाईसोबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 
सरपंचपुत्र सुधाकर नंदू उगलामुगले (वय -३४, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) याला लाच घेताना पकडले.तक्रारदार यांचे मुलाचे नावे मनरेगा अंतर्गत मंजूर जलसिंचन विहिरीचे कुशल कामगाराचे अनुदानाचे रक्कमेच्या चेकवर आरोपी यांनी त्यांचे आईची (सरपंच श्रीमती आशाबाई नंदू उगलमुगले यांची ) सही घेऊन देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना देण्यासाठी असे एकूण २० हजारांची शासकीय पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.दरम्यान जिल्ह्यात पाच लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

 

Advertisement

Advertisement