Advertisement

गोठ्याला लागलेल्या आगीत बारा शेळ्या जळून भस्मसात

प्रजापत्र | Sunday, 25/12/2022
बातमी शेअर करा

केज - शनिवारी रात्रीच्या सुमारास गोठ्याला आग लागल्याने गोठ्यात बांधलेल्या सुमारे दहा ते बारा शेळ्या जळून भस्मसात झाल्याची घटना तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथे घडली आहे.

 

 

महादेव लोलवा धेंडे यांच्या गोठ्याला रात्री (दि.24) रोजी 10 वाजेच्या दरम्यान आग लागली. सदरील आगीने रौद्ररूप धारण केल्याने मदत मिळण्याच्या आत लहान मोठ्या 10 ते 12 शेळ्या होरपळून मरण पावल्या आहेत, सदरील आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु यामध्ये धेंडे कुटुंबाची खूप मोठी आर्थिक हानी झाली आहे.हातावर पोट असणाऱ्या धेंडे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement