माजलगाव - पात्रुड येथील बस स्थानकाच्या पाठीमागे छापा टाकून सुरट जुगार खेळणाऱ्या २२ जुगाऱ्याना आयपीएस डॉ. बी. धिरज कुमार यांच्या पथकाने शनिवारी ९ च्या दरम्यान ताब्यात घेत नगदी रोखासह ९८ हजार रुपयांचा मेद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली.
पात्रुड येथील बस स्थानकाच्या पाठीमागे सुरट जुगार खेळत असल्याची माहिती आयपीएस डॉ. बी. धिरज कुमार यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री ९ वा. दरम्यान पथकातील हेड कॉन्स्टेबल रवी राठोड, अतिषकुमार देशमुख, अनिल भालेराव, युवराज चव्हाण यांनी सापळा रचत जुगार खेळणाऱ्या शेख नाविद शेख अन्वर, मोमीन मतीन युनूस, फेरोज अन्सार पठाण, सय्यद मुजायद हाफीज, तयब सत्तार पठाण, बबु कलीम शेख, सलीम सलिमोद्दिन मोमीन, सय्यद सज्जाद सय्यद ताहेर, शेख जावेद इशरत, समीर शेख अमीर शेख, जालिंदर नवनाथ झगडे, सगिर शहा खतीब, अहमद इनामदार राहमद, मोसिन आत्तार ईलाहिद, तोफिक शेख रशीद, शेख अखिल अतिक, शेख माजेद पाशा, तुकाराम हरिभाऊ बनकर, तोफिक अतीक मोमीन, मोमीन अफरोज आवेश, अर्जुन रामभाऊ भुतकर, कुरेशी मतीन वाहेद या २२ जणांना ताब्यात घेत नगदी रोख सह ९८ हजाराचा मुद्दे मालजप्त केल्याची कारवाई केली.आयपीएस धिरज कुमार यांच्या कारवाईने जुगाऱ्यात खळबळ माजली आहे.