Advertisement

अंबाजोगाईत तरुणाचा खून !

प्रजापत्र | Sunday, 25/12/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज रविवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली.

 

अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा. चिचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चिचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement