बीड-ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहिर झाला असून निकाल ऐकण्यासाठी आलेल्या दोघांच्या मोटरसायकल चंपावती शाळेतून लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
काल बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले.बीड तालुक्यातील निकालाची प्रक्रिया आयटीआयमध्ये पार पडली. यावेळी निकाल ऐकण्यासाठी आलेल्या बाबासाहेब ज्ञानोबा सावंत (रा. किन्ही पाई. नामलगाव) यांची गाडी पॅशन प्लस (क्र.एम. एच.23, पी 9978) व त्रिंबकराव सपकाळ (रा.मित्र नगर बीड) यांची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र.एमएच.23 एल 4999) गाडी काल दुपारी 3.30 च्या सुमारास चंपावती शाळेतून लंपास झाली आहे. याप्रकारणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बातमी शेअर करा