Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाभावी रखडली अल्पसंख्यांक विद्यार्थिनी वसतिगृहाची प्रक्रिया

प्रजापत्र | Monday, 19/12/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)-बीड शहरात अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थीनींसाठी वसतिगृहाची मागणी अनेक वर्षांपासून आहे. यासाठी नगरपालिकेने जागा देण्याचा ठराव देखील केला आहे. मात्र मागच्या वर्षभरापासून यासंदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाअभावी याची पुढील प्रक्रिया रखडली आहे. अल्पसंख्यांक विकास विभाग बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी मागच्या वर्षभरापासून विचारणा करीत आहे.

 

बीड हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थिनी येतात. याठिकाणी अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थीनींसाठी वसतिगृह असावे अशी मागणी होत होती. त्यामुळे नगरपालिकेने ठराव घेऊन यासाठी किला मैदान परिसरातील जागा देण्याचा ठराव देखील दिला आहे. त्यानंतर अल्पसंख्यांक विकास विभागाने या जागेच्या संदर्भाने जिल्हाधिकाऱयांचा अहवाल मागविला आहे. मागील वर्षभरापासून अल्पसंख्यांक विकास विभाग बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल पाठवायला सांगत आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल अजूनही अल्पसंख्यांक विकास विभागाला मिळालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाशिवाय या वसतिगृहाची पुढील प्रक्रिया होणार नसल्याने अल्पसंख्यांक विकास विभागाने पुहा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवायला सांगितले आहे.

 

 

लोकप्रतिनिधींनी द्यावे लक्ष
अल्पसंख्यांक विद्यार्थिनी वसतिगृह हा विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी महत्वाचा विषय आहे. याबाबतचा अहवाल देखील प्रशासन वर्षवर्ष देणार नसेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधींनी देखील यात लक्ष घालणे आवश्यक आहे.
 

Advertisement

Advertisement