केज-तालुक्यातील साबला येथे मतदान वेळ संपायला पाच ते सहा मिनिट राहिलेले असताना दोन मतदार आले.मात्र त्या मतदारांना आणि एका पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदान करण्यास मज्जाव केला जिथे की निवडणूक अधिकारी यांनी पाच ते सहा मिनिटे उरलेली आहेत असे सांगितलेले असतानाही विरोधी पक्षाच्या लोकांनी मतदान करण्यास विलंब केला त्यावरून भांडणाला सुरुवात झाली.यामध्ये एका महिलेसह चौघे जण जखमी झाल्याची घटना साबला येथे घडलेली आहे. रमेशराव आडसकर यांचा एक पॅनल आहे तर दुसरा नंदकिशोर मुंदडा यांचा एक पॅनल आहे.नंदकिशोर मुंदडा यांच्या पॅनल मधील
सदाशिव दिगंबर काकडे, राम लक्ष्मण काकडे (टेलर), भगीरथ श्रीपती काकडे, वैष्णवी बालाजी काकडे यांना मार लागला असून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत पोलीसांत नोंद झाली नसून दोन्हीही पॅनलचे लोक मात्र पोलीस ठाण्यात आलेले आहेत.
बातमी शेअर करा