अंबाजोगाई- अहमदपूर हायवे वरील गिरवली पाटी येथे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या चौकाला कारची जोरात धडक लागून झालेल्या अपघातामध्ये एक ठार व एक गंभीर झाल्याची घटना तालुक्यात घडली आहे.
आंबेजोगाई तालुक्यातील धर्मापुरी जवळील मौजे सौंदना येथील रहिवासी सुर्यकांत (सुनिल) पाटलोबा फड वय तीस हे व त्यांचे गावचे मित्र हे गावाहून mh 24 aw4826 इरटिका
आंबेजोगाई कडे येत असताना गिरवली आपेट व बावने पाटी येथे आंबेजोगाई-अहमदपूर हायवेवर रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या चौकाला इरटिका कारची जोराची धडक बसल्यामुळे कार या चौकाला धडकून पलटी खात खड्ड्यात जाऊन पडली आहे.
यामध्ये सुर्यकांत फड नामक व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबतचे सहकारी यांचा सध्या फोनही लागत नाही व ते तेथे आढळून आले नाहीत. ते नेमके कुठे गेलेत किंवा काय झाले यासाठी गावकरी परेशान आहेत.