बीडः औरंगाबाद परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बीड जिल्ह्यातून अनेक अधिकारी इतरत्र बदलून गेले आहेत.
पोलिस निरीक्षक सवर्गातील बीड जिल्ह्यातील रविंद्र गायकवाड (उस्मानाबाद), शेषेराव उदार (औरंगाबाद ग्रामीण), भागवत फुंदे (जालना), सिद्धार्थ माने (जालना) अशा बदल्या झाल्या आहेत तर जालण्याहून वादग्रस्त पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह औरंगाबादहून बालक कोळी बीड येथे येत आहेत.
एपीआय संवर्गातील लक्ष्मण केंद्रे, ज्ञानेश्वर कुकलारे, प्रमोद भिंगारे या तीघांच्या औरंगाबाद ग्रामीण येथे बदल्या झाल्या आहेत तर पीएसआय संवर्गातील लहुजी घोडे, विलास चव्हाण, रियाजुद्दीन शेख यांच्या औरंगाबाद ग्रामीण येथे तर वैशाली पेटकर यांची उस्मानाबादला बदली झाली आहे तर औरंगाबादहून रंजीत कोसले, शैलेश जोगदंड आणि उस्मानाबादहून हिना कौसर शेख हे तीन फौजदार बीडला येणार आहेत.