किल्लेधारूर दि.13 डिसेंबर - टिक टॉक स्टार संतोष मुंडेसह बाबुराव मुंडे या दोन युवकांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भोगलवाडी येथे आज दि.13 मंगळवारी सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारूर (Dharur) तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार ( Tik Tok Star) संतोष मुंडे व त्यांचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुख व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे (Santosh Munde) यांनी टिक टॉकच्या (Tik Tok) माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात फॉलोवर असून त्यांच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. घटनेची नोंद धारुर पोलिसांत (Police) केली जात आहे.
(One including Tik Tok star Santosh Munde's unfortunate death due to current lag; Incidents in Dharur Taluka.)