बीड-आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची अखेर शासनाने उचलबांगडी केली आहे.अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबत माहिती दिली.राज्याच्या आरोग्य विभागाचा पदभार काही महिन्यापूर्वी सांभाळणाऱ्या तुकाराम मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.शासनाने अद्याप त्यांची इतर ठिकाणी नियुक्ती केलेली नाही. तुकाराम मुंडे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचा आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर अनेक तक्रारी वाढल्या होत्या.वास्तवाचे भान न ठेवता त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागाचे काम ढेपाळले होते.राज्यातून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची बदली करण्याची मागणी शासनाकडे केली होती.अखेर मंगळवारी त्यांच्या उचलबांगडीचे आदेश प्राप्त झाले.दरम्यान त्यांना अद्याप इतर ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही.
बातमी शेअर करा