बीड - शहरातील बार्शी रोडवर जुन्या आरटीओ ऑफिस समोरील असलेल्या एका भंगारच्या दुकानाला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये दुकानातील हजारो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
मोमीन अल्ताफ यांचे बार्शी रोडवर फेमस स्क्रॅप नावाचे भंगाराचे दुकान आहे. या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत भंगार जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बातमी शेअर करा